Trusted Cardiovascular and Pediatric Cardiac Surgeon in Mumbai
Please fill out the form below and we will get back to you as soon as possible.
Trusted Cardiovascular and Pediatric Cardiac Surgeon in Mumbai
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये पाच चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
फोटो कॅप्शन: व्यवस्थापकीय संचालक डॉ. राज नागरकर, सीओओ डॉ. निलेश सिंगळ, बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. ललित लावणकर आणि चिमुकल्यांसोबत कुटुंबीय.
नाशिक, २८ फेब्रुवारी: किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या पाच बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार पडल्या. ही सर्व बालके आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असून, काही सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने आणि आर्थिक मदतीने त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले.
या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. ललित लावणकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच डॉ. राज नागरकर, व्यवस्थापकीय संचालक आणि डॉ. निलेश सिंगळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, किम्स मानवता हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
डॉ. ललित लावणकर यांनी यशस्वी शस्त्रक्रियांबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, जन्मजात हृदयविकार (Congenital Heart Defects - CHD) हे जन्मतःच असलेले हृदयाच्या रचनेतील दोष असून, ते हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. वेळेत उपचार न झाल्यास हे विकार गंभीर स्वरूप धारण करू शकतात आणि मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. या गुंतागुंतीच्या केसेसचे लवकर निदान व अचूक शस्त्रक्रिया अत्यंत आवश्यक असते.
ते पुढे म्हणाले,
"आम्ही उत्कृष्ट बालहृदयरोग उपचार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत, जेणेकरून अशा बालकांना निरोगी आयुष्य मिळू शकेल."
या यशाबाबत व्यवस्थापकीय संचालक डॉ. राज नागरकर म्हणाले की,
"आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र लहान मुलांचा हृदयविकार विभाग असून, या विभागामध्ये हृदयविकार तज्ज्ञ, हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ, नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ, तसेच लहान मुलांच्या अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ चोवीस तास उपलब्ध आहेत."
वरील लक्षणे आढळल्यास तातडीने 2D Echo तपासणी करून हृदयविकार तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन डॉ. ललित लावणकर यांनी केले आहे.
Free heart surgeries for 10 children
Doctors at Vihaan Heart Center and Super Speciality Hospital have demonstrated compassion by performing open-heart surgeries free of cost for a total of five children from economically weaker families.
A one-year-old child named Akshaya was suffering from breathing difficulties and inadequate weight gain. Upon examination, doctors found a large hole in the heart. Similarly, Abhinav (2 years), Sindhu (3 years), Yashwanth (1 year), and Bhargava (2 years) were suffering from heart disease.
All of these children underwent heart surgery and have now recovered and returned home.
A team of cardiologists led by Dr. Arun K. Babaleshwar, along with cardiac surgeon Dr. Sarang Gayakwad and a team of doctors from Asian Heart Institute, Mumbai, carried out all these surgeries. The procedures were performed free of charge under government schemes.
Speaking on the occasion, Dr. Vijayakrishna Kolur, Chairman of Vihaan Heart Center and Super Speciality Hospital, said that Vihaan is committed to providing the best possible cardiac care and services to the people of Karnataka.
In Dharampur 2 open heart surgeries have been performed for the first time at SRHRC
विवेकानंद रुग्णालयात जन्मजात हृदयविकाराच्या गुंतागुंतीच्या १८ शस्त्रक्रिया यशस्वी
देव तारी त्याला कोण मारी.
लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात बाल हृदयरोग तज्ञ डॉ.नितीन येळीकर (लातूर), बाल हृदयरोग तज्ञ डॉ.प्रशांत पाटील (हैदराबाद), बाल हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ.सारंग गायकवाड (मुंबई) यांच्या टीम ने केली उत्कृष्ट कामगिरी. बालरोग हृदय शल्यचिकित्सक डॉ. सारंग गायकवाड आणि त्यांच्या टीमने आठ ओपन-हार्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याशिवाय, डॉ. नितीन येळीकर आणि डॉ. प्रशांत पाटील यांच्या बाल हृदयरोग तज्ज्ञांच्या पथकाने हृदयातील छिद्रे दुरुस्त करण्यासाठी बिनटाक्याच्या दहा शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.
विशेष म्हणजे विवेकानद हॉस्पिटल, लातूर येथे रत्नागिरीतील एका ३२ वर्षीय व्यक्तीवर टीएपीव्हीसी नावाच्या जटिल जन्मजात हृदयविकारावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. लातूर येथील बालहृदय रोग तज्ज्ञ डॉ नितीन अविनाश येळीकर यांनी सांगितले की टीएपीव्हीसी हा एक दुर्मिळ व गंभीर हृदयविकार आहे. हा आजार असलेले शस्त्रक्रिया न झालेले अर्धेरुग्ण शस्त्रक्रिया वयाच्या पहिल्या तीन महिन्यांतच दगावतात. केवळ २०% रुग्ण आयुष्याच्या पहिल्या वर्षात शस्त्रक्रियेशिवाय जगतात. हा हृदयविकार रक्तवाहिन्यांशी निगडित आहे ज्यामध्ये फुफ्फुसातून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या चुकीच्या हृदयाच्या कप्याला जोडलेल्या असतात, परिणामी शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिसळते आणि शरीरास शुद्ध आणि अशुद्ध मिश्रित रक्त पुरवठा होतो. डॉ. येळीकर यांनी अधोरेखित केले की असे गुंतागुंतीचे हृदयविकार रुग्ण शस्त्रक्रियेशिवाय प्रौढत्वापर्यंत जगणे हे दुर्मिळ आहे. डॉ. गायकवाड आणि त्यांच्या टीमने या प्रौढ रुग्णावर शस्त्रक्रिया करून हृदयाच्या योग्य भागाशी रक्तवाहिन्या जोडून हृदयातील छिद्र बंद केले.
ह्र्द्यविकारांची तीव्रता आणि लवकर निदान आणि उपचारांचे महत्त्व ओळखणे महत्त्वाचे आहे. जन्मजात हुदयविकाराची लक्षणे जन्मानंतर लगेच विकसित होऊ शकतात किंवा स्थितीच्या तीव्रतेनुसार उशीर होऊ शकतात, परंतु सकारात्मक परिणामाची शक्यता वाढवण्यासाठी शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे, असेही डॉ येळीकर म्हणाले. योग्य काळजी आणि कौशल्याने, हृदयविकार असलेले रुग्ण या आव्हानात्मक स्थितीवर मात करू शकतात आणि दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा आनंद घेऊ शकतात.
विवेकानंद रुग्णालयात हृदयविकारावरील उपचार उपलब्ध आहेत. बाल हृदय विकारावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे येथे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णालयात एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या शस्त्रक्रिया शासकीय योजना आणि देणगीदारांची उद्दात आर्थिक मदतीतून पार पडतात.
विवेकानंद रुग्णालयातील बाल हृदयरोग तज्ञ डॉ.नितीन येळीकर, बाल हृदयरोग तज्ञ डॉ.प्रशांत पाटील, बाल हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ.सारंग गायकवाड, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ.सी.के.औरंगाबादकर, बालरोगतज्ञ डॉ.प्रमोद तोष्णीवाल, हृदयविकार भूलतज्ञ डॉ.प्रवीण लव्हाळे, भूलतज्ञ डॉ.श्रीकृष्ण कुलकर्णी, शशीकांत नेमहाळे, निहाल बिन नासीर, समन्वय सुचेता महिंद्रकार, श्रीपाद कुलकर्णी, प्रिया शेट्टी यांच्यासह रुग्णालयातील सहकाऱ्यानी परिश्रम घेतले.
या यशाबद्दल विवेकानंद रुग्णालयाचे प्रमुख अनिल अंधोरीकर, डॉ.अशोकराव कुकडे काका, डॉ.गोपीकिशन भराडिया, डॉ.सौ.अरुणा देवधर, डॉ.ब्रिजमोहन झंवर, डॉ.राधेश्याम कुलकर्णी, डॉ.गौरी कुलकर्णी यांनी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
आज दिनांक 14 जून 2023 रोजी योगिता नर्सिंग होम, केज व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, उपजिल्हा रुग्णालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची हृदय रोग निदान व २ डी इको तपासणी करण्यात आली.
माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राम आवाड सर, वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय केज डॉ. संजय राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. दिनकर राऊत (योगिता नर्सिंग होम, केज) यांच्या विशेष सहकार्याने हृदयरोग तपासणी शिबीर उत्तम रित्या पार पडले.
लातूर येथील सुप्रसिध्द बाल हृदयरोग तज्ञ डॉ. नितीन येळीकर व मुंबई येथील सुप्रसिद्ध हृदयरोग शल्य चिकित्सक डॉ. सारंग गायकवाड यांनी ४२ बालकांची हृदयरोग व २ डी इको तपासणी केली. त्यापैकी १४ बालके हृदय रोग शत्रक्रियेसाठी पात्र ठरले. इतर रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन व औषधोपचार केले.
यासाठी रा.बा.स्वा.का चे जिल्हा समन्वयक श्री. रमेश तांगडे, तसेच रा.बा.स्वा.का चे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सदर शिबिराचा लाभ केज, धारूर, वडवणी तालुक्यातील लाभार्थ्यांनी घेतला.